येथील शानभाग हॉल बेळगाव येथे मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेकडून समाजवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.मराठा समाजाला राज्य सरकारकडून आरक्षण मिळविण्याकरिता यशस्वी जणांदोलनसाठी गावोगावी जण जागृती करत समाज कर्तृत्व सिद्ध केले अशा मराठा बांधव भगिनींना समाजवीर असे प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.
याप्रसंगी मराठा समाजातून शासकीय क्षेत्रात पोहोचलेले आदरणीय कर्नाटक मराठा विकास महामंडळ अध्यक्ष मारुतीराव मुळे ,RSS प्रमुख व्यंकट लाले,बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर ,चिकोडी नगरसेवक अनिल माने ,विलास पवार ,मराठा नेते विनय कदम धनश्री देसाई ,कर्नाटक मराठा संघटन उपाध्यक्ष सुमितत्रा उगळे ,प्रवीण पाटील ,हेमंत पाटील विठ्ठल वाघमोडे अशा मान्यवरांसमवेत हजारोंच्या संख्येने बेळगावातील मराठा बांधव भगिनी आणि माता उपस्थित होत्या.