भारतीय वायुसेनेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
भारतीय वायुसेनेच्या एअरमेन ट्रेनिंग स्कूल, (एटीएस) सांबरा येथून सन २०२१-२२ वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ एटीएसच्या निर्मल ऑडिटोरियममध्ये काल मंगळवारी उत्साहात पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून एअरमेन ट्रेनिंग स्कूलचे ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते समारंभमध्ये एल. एम. कोमारी, पी. बी. भालेकर, दीपा आनंदाचे, पी. बी. जॉई, एस. जी. हलगेकर, वाय, बी. दोड्डांनावर, एन. एस. शुक्ला, एस. एन. दळवी, आर. ए. उचगावकर, बी. एन. तलवार, आर. एस. नायक, ए. पी. एडलपुरी, अशोक गवनली, आर. सॅम्युअल, टी. एन. दोड्डांनावर, बी. जक्कांनावर, बी. आर. पंडिती, एम. वाय. येळ्ळूरकर, वीरभद्र सुभेदार आणि असैनिक राजपत्रिक अधिकारी श्रीकांत सुतार यांचा शाल व पुष्पहार घालून तसेच भारतीय वायुसेनेचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ऑफिसर कमांडिंग एअर कमांडोर एस. श्रीधर यांनी सर्वोत्तम सेवा बजावून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे हृदयपूर्वक अभिनंदन व्यक्त केले. सत्कारमूर्तींतर्फे निवृत्त सीजीओ श्रीकांत सुतार यांनी आपले विचार व्यक्त करून ३८ वर्ष आपल्या देशाचे सेवा वाजवण्याची संधी भारतीय वायुसेनेंनी प्राप्त करून दिल्याबद्दल हर्ष व्यक्त केला.
समारंभास एटीएसचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ग्रुप कॅप्टन दीक्षित, एएफएस पीएफचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन पी. के. आचार्य, ग्रुप कॅप्टन एच. एस. विरदी, विंग कमांडर शेखर कुमार आणि असैनिक राजपत्रिक अधिकारी एच. एस. रमेश उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेसीएम् प्रमुख राघवेंद्र होसमनी आणि त्यांचा सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी विश्वनाथ कोल्हार यांनी आभार मानले.