काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीबी इनामदार यांचे निधन झाले आहे. त्यांना निमोनिया आणि पुरुषांच्या संसर्गामुळे रुग्णालया दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचे प्राणज्योत मालवली .
ते कित्तूर परिसरातील धनी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने कित्तूर परिसरात शोककळा पसरली आहे. ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी अनेक महत्त्वाची पदे देखील भूषविली होती.
माजी मंत्री डीबी इनामदार त्यांचे आज सकाळी नऊ वाजता सुमारास निधन झाले. त्यांच्यावर मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर उद्या बुधवार दिनांक 26 रोजी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.