बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुस्कर अनगोळ भाग्यनगर टिळकवाडी या विभागात आणि पदयात्रा बुधवार दिनांक 4 मे 2023 रोजी सकाळी सात वाजता नाना वाडीतील मराठा कॉलनी पप्पा मराठी चौगुलेवाडी गोडसेवाडी आयोध्या नगर शिवाजी कॉलनी याठिकाणी प्रचार फेरी आणि पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
नाना वाडी येथील गणेश मंदिर येथे पूजा करून प्रारंभ करण्यात आला . प्रारंभीर छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, गणेश पूजन यांच्या प्रतिमांची पूजन करून उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले; यावेळी त्यांचा अनगोळ विभागातील वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी करून स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी आणि फलक घेऊन असे विचार फलकांच्या माध्यमातून दाखवण्यात आले. पालकांच्या माध्यमातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध च्या माध्यमातून हुंदका फोडला. सर्व विभागातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात आला. वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून आणि श्री गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला.
पदयात्रेची सुरुवात नानावाडी येथून झाल्यानंतर मराठा कॉलनी बाबा मला टिळकवाडी चौगुले वाडी गोडसेवाडी क्रॉस सर्व अनुदान शिवाजी कॉलनी आणि सर्व येथील परिसर एक ते दहा क्रॉस या ठिकाणी करण्यात आले आयोजन नगर या ठिकाणी पद यात्रेची सांगता करण्यात आली.
यावेळी विविध संघटना महिला मंडळ युवक मंडळी प्रमाण देवस्थान ट्रस्ट गणपती मंदिर ट्रस्ट यांच्या मोठ्या प्रमाणात आला.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर शिवाजी हांडे आनंद देशपांडे माजी नगरसेवक पंढरी परब अनिल पाटील कांता शिंदे राजू बिर्जे श्रीधर पाटील सुनील बोकडे प्रकाश शिरोळकर विशाल कंगनाळकर प्रताप देसाई, निखील भातखंडे, महादेव पाटील नारायण पाटील सागर गुंजिकार, सुधीर लोहार, भरत पाटील, नागराज पाटील प्रभाकर पाटील बी. ओ. येतोजी, माजी महापौर किरण सायानक, माजी नगरसेवक राकेश, माजी नगरसेवक अनिल पाटील, संभाजी चव्हाण संजय सातेरी मोहन बांदुर्गे दिलीप बर्डे प्रभाकर बाळू कुरळे माजी उपमहापौर संजय शिंदे माजी नगरसेवक पाटील संजय सतेरी, श्रीधर पाटील नारायण पाटील सागर गुंजीकर, भारत नागरोळे, मोहन पाटील, रोहन पाटील निखिल भातखंडे सुधीर लोहार प्रभाकर अष्टेकर मोहन भांदुर्गे, भरत पाटील भरत पाटील सचिन पाटील सागर पाटील , अमित पाटील उमेश पाटील, उदय पाटील, सुनील मादार, चंद्रकांत कोंडुसकर , नारायण कोंडुसकर, श्रीकांत कुऱ्याळकर, माझी महापौर आप्पासाहेब पुजारी, रवी गोडसे, विजय चौगुले, भारत नाग रोळी, रोहन पास्टे प्रवीण कोराने शरद कोराने नितीन चौगुले आशिष कुरणकर प्रथमेश कुरणकर संतोष पोटे यासह समिती चे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पदयात्रेचा मार्ग
कोडुसकर यांची पदयात्रा
शनिवारी मराठा मंदिर,
गोकुळ नगर परिसरात
म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ शनिवार
दि. 6 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ मराठा मंदिर येथून मराठा मंदिर परिसर फिरून न्यू गुडशेड रोड मार्गे गोकुळ नगर, गोडसे नगर परिसर फिरून सांगता. म होईल.
पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोडुसकर यांची
पदयात्रा,जाहीर सभा
शनिवारी अनगोळात
म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ मतदार संघात निघालेल्या पदयात्राना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे . पदयात्रा व जाहीर सभा शनिवार दि. 6 मे रोजी अनगोळ येथे आयोजित करण्यात आली आहे .
म.ए.समितीचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या अनगोळ भागातील सर्वच प्रभागामध्ये रमाकांत कोडुसकर यांच्या उमेदवारीमुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दुपारी 3.30 वाजता पदयात्रेचा प्रारंभ अनगोळ नाका येथून होणार आहे. त्यानंतर अनगोळ रोड येथून हाजुगरी, विद्यानगर, मरगाई मंदिर येथून अनगोल रोडमार्गे वाजंत्री गल्ली, राजहंस गल्ली, झेरे गल्ली, लोहार गल्ली, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कलमेश्वर मंदिर मार्गे हणमण्णवर गल्ली, जय महाराष्ट्र चौकातून भादूर गल्ली, नाथ पै नगर, बडमंजी नगर, बाबले गल्ली, दत्त मंदिर येथून चौथे रेल्वे गेट त्यानंतर गणपती मंदिर, झटपट कालनी, शिवशक्ती नगर, रघुनाथ पेठ येथून धर्मवीर संभाजी चौक येथे जाहीर सभेत रूपांतर होईल.
पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.