गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बेळगावला आलले असता त्यांची भेट घेतली आणि येणाऱ्या निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.यावेळी त्यांनी कशाप्रकारे निवडणुकीसंदर्भात रणनीती आखली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी नेहरू नगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांनी बसवण्णा मंदिरापासून प्रचाराला सुरुवात केली.
बसवण्णा मंदिरात बसवण्णाचे दर्शन घेतले .त्यानंतर येथील महिलांनी आरती करून व तिलक लावून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.रवी पाटील यांनी नेहरू नगरच्या पहिल्या क्रॉस, दुसरा क्रॉस आणि तिसरा क्रॉस येथे जनतेची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा देण्यास सांगितले आणि लोकांचा भरभरून पाठिंबा मिळाला.
तसेच डॉ.रवी पाटील यांनी आटोनगर येथील व्यापारी व उद्योजकांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन त्यांना बहुमताने निवडून आणण्याची विनंती केली.
डॉ.रवी पाटील यांनी या विभागातील काही समस्यांवर चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांनी समर्थ नगरला भेट दिली.
या भागातील युवक परिषदेने डॉ.रवी पाटील यांचे जल्लोषात आणि उत्साही तरुणांनी जल्लोषात स्वागत केले. येथील नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्याची विनंती केली.जनतेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शविला.
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.रवी पाटील हे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या काळात जिथे गेले तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
बेळगावातील मल्लिकार्जुन शहरात डॉ.रवी पाटील यांनी 10 मे रोजी सर्वांना मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले.
डॉ.रवी पाटील यांना जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळाला
त्यानंतर बेळगाव केएचबी कॉलनीत प्रचाराला गेले असता त्यांचे त्या पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ.रवी पाटील यांना मतदारांचे आशीर्वाद व पाठिंबा मिळाला
त्यानंतर ते शहरातील फुलबाग गल्लीतील स्थानिक नागरिकांनी भेट घेतली .आपल्या मतदार संघात करावयाच्या विकासकामांबाबत चर्चा केली.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत संपूर्ण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ.रवी पाटील यांना या भागातील जनतेने साथ देण्याची ग्वाही दिली. बेळगावच्या शाहुनगरमध्ये निवडणूक प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
यावेळी tयांनी शाहू नगर मध्ये आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी जमलेल्या जनतेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन डॉ.रवी पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले
तसेच डॉ रवी पाटील यांनी महाद्वारोड तानाजी गल्ली या भागात प्रचार केला .येथील रॅलीत भारतीय जनता पक्षाचे दिग्गज, महिला युनिटचे पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचा जयघोष करण्यात आला.डॉ.रवी पाटील यांनी घरोघरी जाऊन मतांची मागणी केली.नागरिकांनी डॉ.रवी पाटील यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला.
यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच रवी पाटील यांचा सत्कार करून पाठिंबा व्यक्त केला.
cover amit shaha road show