उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे
दहा तारखेला झालेल्या मतमोजणीचा निकाल उद्या दिनांक 13 मे रोजी लागणार असून सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.
येथील आरपीडी कॉलेजमधील स्ट्रॉंग रूम मध्ये बेळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमधील ईव्हीएम मशीन जमा करण्यात आले आहेत.
तसेच या ठिकाणी कोणताही घोटाळा होऊ नये याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असल्याची माहिती आज निवडणूक तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली
तसेच उदार दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील असा अंदाज देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी वर्तविला. यावेळी ते म्हणाले की उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल आधी पोस्टर मतमोजनांची मतमोजणी होईल त्यानंतर अर्धा तासानंतर ईव्हीएम मशीन मधील मतांची मोजणी केली जाईल.
पोस्टल मतांची मोजणी झाल्याखेरीज ईव्हीएम मतमोजणी होणार नाही. एका मतदार संघासाठी 11 टेबल ईव्हीएम यंत्राद्वारे होणाऱ्या मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत. तर दोन टेबल हे पोस्टल मतदान मोजण्यासाठी राखीव आहेत मतमोजणीसाठी एकूण 1188 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 360 मायक्रो ऑब्जर्व्हर्स असणार आहेत.
मतदान प्रक्रिया शांततेने आणि सुरळीत पार पाडावे याकरिता मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलमान्वय जमावबंदीचा आदेश जारी केला आहे तसेच मतदान केंद्राचे 200 मीटर परिघांमध्ये हा आदेश जारी असून त्या ठिकाणी चौथ्या स्तरावरील सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे.
त्याचबरोबर मतमोजणी केंद्राच्या परिसरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार असून पार्किंगची सोय मतदान केंद्रापासून काही अंतरावर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिली.