होनगा, बेळगांव येथील ॲड. नितीन धोंडिबा आनंदाचे यांच्या “माझी चारधाम यात्रा” या प्रवास वर्णनाच्या पुस्तकला मिरज येथील “मासिक सारांश साहित्य पुरस्कार -2023” हा महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
मासिक सारांशचे संस्थापक डॉ. अनिल दबडे व मासिक सारांश परिवार यांनी यंदाच्या मासिक सारांश साहित्य पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली आहे. ॲड. नितीन आनंदाचे यांना “माझी चारधाम यात्रा” या प्रवासवर्णन पुस्तकासाठी यापूर्वी क्रांती गुरु लहुजी साळवे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, मुं गुणध, लोणार महाराष्ट्र (मार्च 2023) पुरस्कार तसेच श्री मळेकरी क्रेडिट सौहार्द सोसायटी, उचगाव बेळगाव यांचा साहित्य भूषण पुरस्कार मिळाला आहे. आता माझी चारधाम यात्रा या प्रवास वर्णनाला मासिक सारांश साहित्य पुरस्कार -2023 हा महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड. नितीन आनंदाचे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून प्रा. अलगोंडी व ॲड. जयराज मोदगेकर यांनी ॲड. आनंदाचे यांचे खास अभिनंदन केले आहे.