बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी, प्यास फाऊंडेशन आणि जायनटस ग्रुप ऑफ बेळगाव परिवाराच्या वतीने आयोजित पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली शनिवारी 27 मे 2023 रोजी गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक ते साई बाबा मंदिर टिळकवाडी बेळगाव पर्यंत सुमारे 200 च्या वर . या रॅलीत 4-16 वर्षांच्या वयोगटातील स्केटरनी सहभाग घेतला होता एकूण 2 किमी अंतर कव्हरिंग करत “पाणी वाचवा जीवन वाचवा” ही जनजागृती करणारी ही रॅली लोकांमध्ये संदेश देत होती या रॅलीला डॉ. माधव प्रभू अध्यक्ष प्यास फाऊंडेशन, श्री राजू माळवदे फेडरेशनचे सदस्य यांचे हस्थे सुरवात करनात आली यावेली श्री. किरण वेसणे अध्यक्ष जायनटस ग्रुप ऑफ बेळगाव परिवार, श्री अभिषेक डागा, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, गणेश दड्डीकर, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सक्षम जाधव, क्लिफ्टन बेरेटो, समीक्षा वाली सागर चोगुले, नितीन कुदळे, बेळगावचे रोलर अकादमीचे स्केटर आनी पालक वर्ग मोटया प्रमानात उपस्थीत होते.
पाणी वाचवा जीवन वाचवास्केटिंग रॅली 2023
By Akshata Naik

Previous articleकावळेवाडी येथील भव्य अश्वारूढ मूर्तीची शहरात निघाली मिरवणूक