धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथून आज भव्य अश्वारूढ शिवमूर्तीचे भव्यसवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी कावळेवाडी येथील शिवभक्तानी भगव्या मय वातावरणात भगवे कपडे भगवे फेटे घालून सवाद्य मिरवणुकीत अश्वारूढ मूर्तीची मिरवणूक काढली.
बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना येथे 11 तारखेला करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी महाराजांची मूर्ती संभाजी महाराज चौक येथे आणल्यानंतर शिव पुतळ्याचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळळी माजी आमदार अनिल बेनके संजय पाटील डॉक्टर रवी पाटील यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय यासह आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी महाराजांच्या पूजनानंतर मिरवणूक शहरात फिरून गणेशपुर बेंकनहळळी मार्गे कावळेवाडी ला नेण्यात आली. तसेच ठिकठिकाणी मिरवणुकीचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले.