कर्नाटक प्रशासनाला नेहमीच मराठीची कावीळ असते, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आता नवनिर्वाचित आमदारांच्या पाट्या महानगरपालिका इमारतीत लागल्या असून तीन भाषेत असणाऱ्या नावाच्या पाटीवर मराठीतील मजकुरात चुका झाल्याचे निदर्शनात आले आहे. बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांच्या नावाच्या पाटीवरील मराठीतील मजकुरात ‘श्री असिफ (राजू) शेठ’ असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय बेळगावचा उल्लेख बेळगावी असा करण्यात आला आहे. मराठीसह इंग्रजी भाषेतील मजकुरातही व्याकरणाच्या चुका झाल्याचे आढळून आले असून Shri. Asif (Raju) Sait च्या ऐवजी SHRI. Asif (Raju) Sait असा उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर मराठी भाषिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून तातडीने या पाटीवरील मजकूर दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
आमदारांच्या पाटीवर चुका!
By Akshata Naik

Must read
Previous articleमहेश नवमी निमित्त ज्योतिबा देवाला लघुरुद्राभिषेक आणि गंगापूजन
Next articleझाड उन्मळून पडल्यामुळे चार दुचाकींचे नुकसान