कंग्राळी खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक नाथा लुमाण्णा पाटील यांच्या अर्धांगिनी सौ. सुनीतादेवी नाथा पाटील यांची विद्यामंदिर राजगोळी खुर्द येथे मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल कंग्राळी खुर्द ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
कंग्राळी खुर्द ग्रा. पं. अध्यक्ष यल्लापा लुमाण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीतर्फे सत्कार झाल्यानंतर राजगोळी खुर्द गावातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांसह आर. आय. पाटील व बी. डी. मोहणगेकर यांनी मुख्याध्यापिकापदी नियुक्ती झाल्याबद्दल सुनीतादेवी नाथा पाटील यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य राकेश पाटील, वैजु बेन्नाळकर, कल्लाप्पा पाटील, विनायक कम्मार आदींसह गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतक कांबळे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन प्रशांत गोपाळ पाटील यांनी केले.