बेळगाव:गेल्या पाच महिन्यापासून संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या “वृद्धांना आधार” या योजनेला जायंट्स सखीने रोख एक्कावन हजारांची मदत करून एक मोठा आधार देण्याचे कार्य केले आहे.
अध्यक्षा विद्या सरनोबत यांच्याहस्ते रोख एक्कावन हजार रुपये मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केले.
“वृद्धांना आधार” उपक्रमाचा उद्देश हा गरीब आणि उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुरक्षित करणे आहे. त्यांच्या मूलभूत गरजा,दोन वेळचे जेवण,त्यांना लागणारी औषधे, गरज भासल्यास हॉस्पिटलला घेऊन जाणे, कायद्याची मदत
अशा अनेक गोष्टी आहेत त्यापैकीच एक संजीवनी मासिक रेशन सपोर्ट सुरू करण्यात आले असून बेळगावमधील शक्य तितक्या उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत साहित्याचे किट प्रत्येक महिन्याला देण्यात येत आहे. हजारो वंचित गरीब वृद्ध जगण्यासाठी धडपडत आहेत, म्हातारपणी ते काम करू शकत नाहीत आणि कमवूही शकत नाहीत अशा वृद्धांना निदान दोन वेळचे जेवण देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठीच ही योजना असल्याचे संजीवीनीचे कार्यकारी संचालक मदन बामणे यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर यांनी उपक्रमाचे कौतुक करून सखीने केलेल्या मदतीचे इतरांनीही अनुकरण करावं असे सांगितले.
अध्यक्षा विद्या सरनोबत यांनी यापुढेही आम्ही संजीवीनीसोबत कार्य करू आणि परिसरातील जास्तीतजास्त वृद्धांना मदत करण्यासाठी कटिबद्ध राहू असे सांगितले.
संजीवीनी फौंडेशनच्या संस्थापिका सविता देगीनाळ यांनी फौंडेशनच्या माध्यमातून मानसिक रुग्णांसाठीही काळजीकेंद्र सुरू केल्याचे सांगितले. तसेच सध्या बारा अत्यंत गरजू वृद्धांना गहूपीठ, ज्वारी,मीठ,बिस्किटे,डाळी,कडधान्ये, साबण,तेल, मसाला, साखर,चहा पावडर कांदे, बटाटे, गूळ अशा प्रत्येकी वीस किलोपेक्षाही जास्त रेशन कीटचे वाटप गेले चार महिने सतत करण्यात येत असल्याचे सांगितले. शेवटी वृद्धांना आधार या कार्याला हातभार लावल्याबद्दल जायंट्स सखीच्या सभासदांचे आभार मानले .
या वेळी नम्रता महागावकर, वृषाली मोरे, चंद्रा चोपडे, शीतल नेसरीकर, सुलक्षणा शिनोळकर, शीतल पाटील, अर्पणा पाटील, राजश्री हसबे, स्वाती फडके, संजना पाटील, नीलिमा मिरजकर, निता पाटील, ज्योती पवार, अर्चना कंग्राळकर, ज्योती सांगूकर, शीला खटावकर, वैशाली भातकांडे, लता कंग्राळकर, दीपा पाटील, हेमा सांबरेकर, वरदा अंगडी, दीपाली मालकरी, रेणू भोसले आदी उपस्थित होत्या.