बेळगाव रविवार दि९ जुलै २०२३ नवयुवक एकता मंडळ कुंती नगर आणि श्री दत्त सेवा समिती टिचर्स कॅालनी खासबाग यांच्या सौजन्याने टिचर्स कॅालनी दत्त मंदिर येथे नुकतेच मोफत आरोग्य तपासनी शिबिर संपन्न झाले. या शिबिरा मध्ये मोफत डोळे तपासनी, बी.पी, शुगर तपासनी तसेच डेंगू आणि चिकणगुणीया यावरील डोस वितरीत करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगपती श्री शरद पाटिल उपस्थित होते. अतिथी म्हणून श्री अजित बांदेकर, श्री विशाल सैनुचे, श्री रवी हेरेकर, श्री वाय.एम.सुळेभावी, श्री के.सी.मुडी, श्री लालू बाडीवाले, श्री सुर्यकांत हिंडलगेकर, श्रीमती स्मिता अनगोळकर इत्यादी गण्यव्यक्ती उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी टिचर्स कॅालनी येथील उद्योजक आणि तडफदार समाज सेवक श्री जयेश सुरज भातकांडे यांनी विषेश प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री बापूसाहेब देसाई यानी पार पाडले. या शिबिराचा लाभ टिचर्स कॅालनी खासबाग परिसरातील हजारो लोकांनी लाभ घेतला. या उपक्रमाबद्दल श्री जयेश भातकांडे व त्यांचे सहकार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
By Akshata Naik

Previous articleए डी जी पी यांनी दिली त्या जैन मुनींच्या आश्रमाला भेट
Next articleआमदारांनी केली कोनवाळ गल्लीची पाहणी