पोलीस प्रशासन आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळा आज शहरातील जैन कॉलेजमध्ये पार पडली.
जैन कॉलेजमध्ये आयोजित या कार्यशाळेस प्रमुख व्यक्ती म्हणून कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे कशी काळजी घ्यावी, अँटी ड्रग्सचे तोटे आणि त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या या संदर्भात व्हिडिओ व पीपीटी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थी यांच्या शंकांचे निरसन करण्याबरोबरच प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांच्या सूचना व अभिप्राय जाणून घेण्यात आले. त्याचप्रमाणे आपत्कालीन प्रसंगी पोलिसांपर्यंत कसे पोहोचावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नारू निलजकर अवधूत तुडवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.