सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या बेळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.बेळगाव जिल्ह्यातील खानापुर तालुक्यात सर्वाधिक तर रामदुर्ग तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यातील खानापुर तालुक्यात सर्वाधिक 41.2 मिमी पाऊस झाला आहे, तर रामदुर्ग तालुक्यात केवळ 1.1 मिमी पाऊस झाला आहे.पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात 200 पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला असून, मलप्रभा नदीच्या नवलतीर्थ जलाशयातील पाण्याची पातळी दोन फुटांनी वाढली आहे. जिल्ह्यातील घटप्रभा नदीत विसर्ग 20 हजार क्युसेक, हिडकल जलाशयातील पाण्याची पातळी दोन फुटांनी वाढली असून, जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
नदी काठ हिरवीगार झाली आहे.पाणी समस्या मिटली आहे. बेळगाव जिल्ह्यात अवघ्या 24 तासांत एकूण 141.9 मिमी पाऊस झाला ही आनंदाची बाब आहे. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळ बेळगाव जिल्ह्यातील अनेक पुलांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.घटप्रभा नदीचा गोकाक-सिंगळापुरा पूल, खानापूर तालुक्यातील अलातारी नाळे पूल, कृष्णा नदीचा मंगळवती पूल, जत्राटा-भिवशी पूल. वेदगंगा नदीचा पूल पाण्याखाली गेला असून, जिल्हा पोलिसांनी बुडीत पुलाचा वापर करू नये, असे आवाहन अधीक्षकांनी केले आहे.