गेल्या नऊ वर्षापासून कृष्णा लक्ष्मण देवगाडी याने इंडियन कराटे क्लब मच्छे येथे कराटेचे प्रशिक्षण घेतले. कृष्णा याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी सुवर्णपदके पटकावले आहेत याकरिता त्याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
कृष्णाचे वडील हे सुद्धा कराटेचे प्रशिक्षण घेत होते पण काही कारणास्तव त्यांचे स्वप्न अधूरे राहिले आज कृष्णा याच्या कठोर परिश्रमानंतर इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट , प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कृष्णा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी बेळगावच्या महापौर श्रीमती शोभा सोमनाचे डॉ. पद्मराज पाटील , समाजसेविका माधुरी जाधव पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष जैनोजी आदी मान्यवर उपस्थित होते.