दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या तसेच आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या बेळगावच्या शरीरसौष्ठपटूंचा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
मालदीव येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू व्यंकटेश ताशिलदार याने कांस्य पदक मिळविले आहे. त्याचप्रमाणे प्रवीण कणबरकर याला चतुर्थ क्रमांक मिळाला आहे. याचबरोबर शरीरसौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर व केतकी पाटील यांची नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई आणि दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल सदर सर्व शरीरसौष्ठवपटूंचा क्रीडाप्रेमी असलेले बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, सेक्रेटरी एम. गंगाधर सुनील राऊत आदी उपस्थित होते.