स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी मराठा युवक संघाने नुकत्याच आयोजित केलेल्या 18 व्या आंतर शालेय व महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करताना 27 सुवर्ण, 27 रौप्य आणि 19 कांस्य पदकांची लयलूट केली. तसेच विविध गटांची 8 वैयक्तिक अजिंक्यपदे देखील हस्तगत केली आहेत.
शहरातील मराठा युवक संघातर्फे गोवावेस येथील रोटरी -मनपा जलतरण तलाव येथे 18 वी आंतरशालेय व महाविद्यालयीन जलतरण स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळविलेले यश पुढील प्रमाणे आहे. अमन सूणगार (गट एक) -4 सुवर्ण पदकं, इमानी जाधव (खुला गट) -3 सुवर्ण पदकं, अनिश पै (गट दोन) -3 सुवर्ण पदकं, तनिष्क मोरे (खुला गट) -2 सुवर्ण, 1 रौप्य पदक, दर्शन वरूर (खुलागट) -2 सुवर्ण, 1 रौप्य पदक, वेदांत मिसाळे (गट तीन) -2 सुवर्ण, 1 रौप्य पदक, सुनीधी हलकेरी (गट एक) -2 सुवर्ण, एक रौप्य पदक, पुढील सर्व गट सहा अहीका हलगेकर -2 सुवर्ण, 2 रौप्य पदकं, पाखी हलगेकर -2 सुवर्ण, 1 रौप्य पदक, अथर्व कम्मार -1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदक, समृद्धी हलकेरी -1 सुवर्ण, 2 रौप्य पदकं, गाथा जैन -1 सुवर्ण, 2 रौप्य पदकं, सार्थक श्रेयकर -1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदक, दर्शिका निट्टूरकर -1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदक, अनन्या पै -2 रौप्य पदकं, जीशांत भाटी -2 रौप्य पदकं, अथर्व राजगोळकर -1 रौप्य पदक, राघव कडट्टी -1 रौप्य, दोन कांस्य पदकं, युवराज पावशे -1 रौप्य, 2 कांस्य पदकं, समीक्षा घसारी -1 रौप्य, 1 कांस्य पदक, सकेत होसमठ -1 रौप्य, 1 कांस्य पदक, साईश पाटील -1 रौप्य पदक, जिनू होंडदकट्टी -1 रौप्य पदक, वंश बिर्जे -1 रौप्य पदक, सनत भट -1रौप्य पदक, विहान कोरी -2 कांस्य पदक, भगतसिंग गावडे -2 कांस्य पदक, विरूधी शानभाग -2 कांस्य पदकं, तन्वी पै -2 कांस्य पदकं, लावण्या आदीमनी -1 कांस्य पदक, राघवी गस्ती -1 कांस्य पदक. या जलतरणपटूंपैकी अमन सूणगार, इमानी जाधव, अनिश पै, तनिष्क मोरे, दर्शन वरूर, वेदांत मिसाळे, सुनिधी हलकेरी व अथर्व कम्मार यांनी आपापल्या गटाची वैयक्तिक अजिंक्यपदे मिळविली.
उपरोक्त सर्व जलतरणपटू शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये पोहण्याचा सराव करतात त्यांना अक्षय शेरीगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर, विनायक आंबेवाडीकर, अजित जिनतीनकट्टी, आशिष कुरणकर व सतीश यादव यांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर व इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.