हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि बी के बांडगी ट्रस्ट यांच्यावतीने बेळगाव तालुक्यातील हायस्कूल मधून दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा गौरव रविवार दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी सायं. 4 वा. मारुती मंदिराच्या बांडगी सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन सामजी नगरसेवक नितीन जाधव हे उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून झूवारी ऍग्रो केमिकल्स चे निवृत्त उपाध्यक्ष व कंपनी सेक्रेटरी श्री आर वाय पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या अगोदर नावे नोंदविलेल्या सर्व विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसह उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे