फुलांच्या कचर्यापासून सुगंधी अगरबत्ती बनवण्याच्या प्रकल्पाला बुधवारी चालना देण्यात आली आहे. देशातील हा पहिला प्रयोग महापालिकेकडून राबवण्यात येत असून हरित लवादाचे अध्यक्ष न्या. सुभाष आडी यांनी त्याचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे बेळगावचे नाव देशभरात गेले आहे.
शहरातील मंदिरे आणि फूल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचा कचरा तयार होत असतो. याच फुलांच्या कचर्यापासून सुगंधी अगरबत्ती तयार करण्यात येणार आहे. हरित लवादाचे अध्यक्ष न्या. सुभाष आडी यांनी या प्रकल्पाबाबत कौतुक केले. संपूर्ण देशात हा प्रयोग करणारी बेळगाव ही पहिली महापालिका ठरली आहे. बुधवारी सकाळी न्या. सुभाष आडी यांच्या हस्ते महांतेशनगरात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील,पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी, सहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रविणकुमार खिलारे आदी उपस्थित होते.