दरवर्षीप्रमाणे मार्तंड युवा संघ, मेन रोड बसवण कुडची यांच्यातर्फे आयोजीत हिंडलगा येथील शाहीर वेंकटेश देवगेकर यांचा पोवाडा कार्यक्रम आणि शिवचरित्रावरील नाटक असा संयुक्त कार्यक्रम काल शनिवारी रात्री उस्फुर्त प्रतिसादात पार पडला.
सदर कार्यक्रमांच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड. अनिल बेनके, उपमहापौर रेश्मा पाटील व नगरसेवक बसवराज मोदगेकर उपस्थित होते. प्रारंभी माजी आमदार बेनके यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे, तर उपमहापौर पाटील यांच्या हस्ते श्री दुर्गामाता प्रतिमेचे पूजन झाले. नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी श्रीफळ वाढविला. मार्तंड युवा संघातर्फे पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राजू हिरेमठ, गजानन मुचंडीकर आणि अवंतिका सावकार यांचाही विशेष सत्कार केला गेला.
याप्रसंगी परशराम बेडका, यल्लाप्पा मुचंडीकर, मल्लाप्पा बेडका, जोतिबा मुतगेकर, नामदेव जैनोजी, नामदेव मुतगेकर, राजू कलेकणावर, निळकंठ हिरेमठ, सुनील दिवटे, बसू तारिहाळकर, बसवंत भातकांडे, लक्ष्मी पाटील, प्रतिभा धर्मोजी, माधुरी बेडका आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, निमंत्रित मंडळी, गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश इटगेकर यांनी केले. जोतिबा मुतगेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्तंड युवा संघांचे अध्यक्ष आनंद दिवटे आणि उपाध्यक्ष शिवाजी बेडका त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पोवाडा कार्यक्रम आणि शिवचरित्रावरील नाटकास गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.