टिळकवाडी दुसरे रेल्वे फाटक ते एम. व्ही. हेरवाडकर स्कूलदरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे .या मार्गावरील रस्ता खराब झाला होता. जागोजागी खड्डे पडले होते. वाहनधारक, दुचाकी, मोटार चालकांना येथून मार्ग काढताना अडचणी येत होत्या. यामुळे स्थानिक रहिवासी व शाळेतर्फे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.
याबाबतचे निवेदन दक्षिण वायव्य रेल्वे सल्लागार समिती हुबळीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांना देण्यात आले. कुलकर्णी यांनी ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे अधिकारी सेथीलकुमार यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली. दुसरे रेल्वे गेट ते एम. व्ही. हेरवाडकर या दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे येथील मार्ग व्यवस्थित झाला असूत, वाहतूकती आता सुरळीत झाली आहे
या रेल्वे फाटकावरील रस्त्याची झाली दुरुस्ती
