आज ४ मार्च रामकृष्ण परमहंस यांची जयंती आहे. त्या निमित्त विशेष लेख !
कालीमातेचे परम भक्त रामकृष्ण परमहंस !
१८३६ला कामारपुकुर (बंगालमधील एक गाव) येथे एका बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव गदाधर असे ठेवण्यात आले. लहानपणापासूनच त्या बालकाला देवाची पूजा, भजन, सत्संग याची आवड होती. तारुण्यात दक्षिणेश्वरला आलेल्या गदाधरने स्वतःला कालीमातेच्या उपासनेत झोकून दिले. गुरु तोतापुरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कठोर साधना करून त्यांनी परमहंस पदवी प्राप्त केली. रामकृष्ण परमहंस म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही आपल्या हृदयात वास करत असल्याचे ते सांगायचे. सहस्रो लोक त्यांचे शिष्य झाले. त्यांचे कार्य समर्थपणे पुढे नेणारे होते स्वामी विवेकानंद ! श्री रामकृष्ण परमहंस कालीमातेचे भक्त असल्याचे सर्वांना माहिती आहे; परंतु त्यांनी विविध रीतीने भक्ती करून इतर देवतांचे दर्शन घेतले होते. त्यातील काही उदाहरणे पाहूया.
श्रीरामाच्या दर्शनासाठी हनुमंतासारखी तपस्या करणारे रामकृष्ण !
दैवी तत्त्वाची विविध रूपे आणि भक्तीच्या विविध पद्धती समजून घेण्यासाठी रामकृष्णांनी अनेक प्रयत्न केले. रामायण काळात श्रीरामाच्या दर्शनासाठी हनुमंताने जशी तळमळीने तपस्या केली, तीच स्थिती रामकृष्णांनी अनुभवली. हनुमंतासारखीच श्रीरामाची अनुभूती घ्यायची म्हणून भक्ती इतकी तीव्र होती की, त्यांच्यात वानराची अनेक लक्षणे दिसू लागली. या प्रयत्नांमुळे प्रसन्न झालेल्या श्रीरामाने त्यांना दर्शन दिले.
गोपिकांप्रमाणे श्रीकृष्णाच्या दर्शनाची इच्छा !
भगवान कृष्णासह असताना आणि त्याच्या भक्तीरसात तल्लीन होणार्या गोपी जशा श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी तळमळायच्या तशीच श्रीकृष्ण दर्शनाची इच्छा रामकृष्णांना झाली. एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून श्रीकृष्णाची भक्ती ते स्त्रीसारखेच दिसू/वागू लागले. त्यांचे वर्तन असे होते की, काही लोक त्यांना स्त्रीच समजू लागले ! स्वतःमध्ये एका स्त्रीची श्रीकृष्ण दर्शनाची इच्छा जागृत करणार्या रामकृष्णांना भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाचे भाग्य देखील लाभले.
आपला विश्वासू
श्री. विनोद कामत
राज्य प्रवक्ता, सनातन संस्था
संपर्क : ९३४२५९९२९९