No menu items!
Friday, November 22, 2024

हॉटेल फेअरफिल्ड मॅरियटमध्ये हिरे चोरी; सुरक्षेशी तडजोड केल्याचा ठपका

Must read

बेळगाव शहराच्या बाहेरील काकती येथे असलेल्या फेअरफिल्ड मॅरियट या प्रतिष्ठित स्टार हॉटेल च्या व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवर सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड करणे आणि पाहुण्यांच्या अनुपस्थितीत हॉटेलच्या खोलीचा गैरवापर करणे या संदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुमारे 9 ते 10 लाख रुपयांच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्याप्रकरणी बुधवारी स्थानिक काकती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पाहुण्यांच्या अनुपस्थितीत हॉटेलच्या खोल्यांचा गैरवापर, हॉटेलमध्ये एकट्या राहणाऱ्या महिला रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, पाहुण्यांना त्यांच्या गैरहजेरीत देण्यात आलेल्या खोल्यांचा गैरवापर या संदर्भात निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन तक्रारदाराने केले आहे.


हरियाणातील गुरगाव येथील ओलम अॅग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंट्री एचआर हेड शिप्रा बिजावत यांनी स्थानिक काकती पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.
शिप्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी 15 मार्च रोजी सकाळी 10 च्या सुमारास हॉटेलमध्ये चेक इन केले होते, जिथे त्यांना खोली क्रमांक 219 देण्यात आली होती. त्यांनी आपले सामान खोलीत ठेवले आणि महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथील साखर कारखान्याच्या भेटीसाठी त्या गेल्या. रात्री साडेदहाच्या सुमारास त्या परत आल्या.


“जेव्हा मी माझ्या खोलीत प्रवेश केला तेव्हा मला आढळले की कोणीतरी माझी खोली उघडली आहे आणि माझ्या गैरहजेरीत प्रवेश केला आहे आणि माझ्या मौल्यवान हिऱ्याच्या बांगड्या ९ ते १० लाख रुपये किंमतीच्या चोरी केल्या आहेत. शिवाय टॉवेल, बेडशीट आणि वॉशरूम सारख्या माझ्या रूम
अ ॅक्सेसरीजही माझ्या नकळत वापरण्यात आल्या आहेत. खोलीत प्रवेश करणार्या आणि खुर्चीवर ओल्या बाथरूम टॉवेल सोडणार्या व्यक्तीने अथवा कोणीतरी शॉवर घेतला आणि बाथरूम अजूनही ओल्या अवस्थेत होते”, असे शिप्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे.


पुढे त्या म्हणाली की, “ताबडतोब मी मॅरियट हॉटेल मॅनेजमेंटच्या कर्मचार्यांना खोलीत इतर काही जणांच्या प्रवेशाबद्दल माहिती दिली आणि त्यांना माझ्या खोलीचे अचूक दृश्य दाखवले. सुरुवातीला त्यांनी माझ्या खोलीत कोणालाही प्रवेश दिल्याचे नाकारले मात्र नंतर त्यांनी हे मान्य केले की त्यांच्या हाऊसकीपिंग स्टाफने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका जोडप्याला दुपारी ३ ते ६ च्या दरम्यान याच खोलीत राहण्याची परवानगी दिली होती. हॉटेल व्यवस्थापनाच्या विरोधात त्यांनी गोपनीयता आणि विश्वासाचा भंग केल्याप्रकरणी त तक्रार दाखल केली आहे.
शिप्रा बिजावत यांनी तक्रारीत असा दावा केला आहे की,या संपूर्ण परिस्थितीमुळे तिला खूप मानसिक त्रास झाला आणि कामात व्यत्यय आला. सुरक्षिततेच्या चिंतेमुळे त्यांना घटनेनंतर रात्रभर झोप लागत नव्हती. त्यांनी पोलिस विभागाला योग्य तपास करून हिऱ्याच्या बांगड्या आणि हॉटेल व्यवस्थापनाकडून नुकसान भरपाई वसूल करून देण्याचे आवाहन केले आहे. या संपूर्ण घटनेत हॉटेल व्यवस्थापनाचा सहभाग असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हॉटेलला भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!