कोरोनामुळे दोन वर्षे दहावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सक्ती नव्हती. मात्र आता दहावी परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे .
शिक्षण खात्याने पत्रक जारी करून सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचे कळविले आहे .दहावीची परीक्षा 28 मार्चपासून सुरू होत असून तत्पूर्वी परीक्षा केंद्रावर आवश्यक गोष्टींची पूर्तता करायची सूचना केल्या आहेत .
नोडल अधिकाऱ्यांकडून केंद्राची पाहणी करून सूचना केल्या जात आहे.सीसीटीव्ही कॅमेरे केंद्रांवर बसविल्यामुळे परीक्षा सुरळीत पार पाडण्यास मदत होणार असून कॉपी सारख्या प्रकाराला देखील आळा बसणार आहे .
जर शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यास दुरुस्त करून घेण्याचे देखील सांगण्यात आले आहे .परीक्षाकाळात कॉपीचे प्रकार घडू नयेत याची दखल घेतली जाणार आहे .
काही वर्षांपासून केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अधिक खर्च येतो .त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अनुदान देण्याची मागणी खासगी शाळांकडून होत आहे.
तसेच सरकारी माध्यमिक शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.