गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमिवर तसेच बसवान यात्रेच्या निमित्ताने येथील अष्टे खणगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी या कार्यक्रमाला राजमाता जिजाऊ शहाजी राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंडलगा येथील वेंकटेश यांनी पोवाडा सादर केला.
यावेळी त्यांनी अंगावर शहारे उभे करणारा तसेच अतिशय सुंदर असा पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमाला खणगाव अष्टे कणबर्गी यासह आजूबाजू परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.