डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्या बाबत डॉ बाबासाहेबआंबेडकर उद्यानात सभा घेण्यात आली .या सभेला दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली .त्यानंतर 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अशोक स्तंभ येथून कसाईगल्ली, मार्केट पोलीस स्टेशन,चव्हाट गल्ली, ते चन्नम्मा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर उधान पर्यंत भीम जोतिचे मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीम ज्योतीचे स्वागत करण्यात येणार असून तेथून काळी अंबराई, कंग्राळगल्ली येथून ते धर्मवीर संभाजी चौक येथे या भीम ज्योतीचे सांगता करून नंतर रूपक वाहनाचे मिरवणूक काढण्यात येणार असल्याची चर्चा करण्यात आली .
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, महामंडळचे माजी अध्यक्ष रेव्हेन्यू बँकचे अध्यक्ष बसवराज बल्लूगोळा, सिद्धाप्पा कांबळे ,मल्लेश कुरंगी अर्जुन देमट्टी, डॉ गजानन कांबळे, महादेव तळवार , मल्लापा तळवार, दीपक मेतत्री , बाबू पुजारी,जीवन कुरणे, महेश कोलकार, मोहन कांबळे, सुनील बस्तावडकर, गजू धारणाईक, शंकर कांबळे, सहित इतर दलित नेते यावेळी उपस्थित होते
तसेच उपस्थित सदस्यांसमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर महामंडळ नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी
उत्सव महामंडळ अध्यक्षपदी यल्लप्पा कोलकार, उपाध्यक्ष म्हणून सुधीर चौगुले व सिद्राय मेत्री, सेक्रेटरी म्हणून कृष्णा कांबळे,उप सेक्रेटरी म्हणून रवी बस्तवाडकर, खानजनी म्हणून संतोष हालगेकर जनसंपर्क सदस्य म्हणून दुर्गेश मेत्री, संतोष कांबळे,महादेव हादीमनी,शंकर कांबळे, बाबू पुजारी, यांची निवड करण्यात आली.