धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रसंग आज चन्नम्मा सर्कल जवळील संगोळी रायान्ना मार्गावर घडला. यावेळी अचानक कार मधून धूर निघाल्याने रस्त्यावर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
यावेळी मोठा अनर्थ घडू नये याकरिता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सदर घटना आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कारवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांनी अग्निशमन दलाला त्याठिकाणी पाचारण करून कुलिंग ऑपरेशन केले. प्रसंगी कारने पेठ घेतला नसल्याने
सुदैवाने कारचालक बाल बाल बचावला.