मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन येथील गोवावेस जवळील मराठा मंदिर मध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक शीतल व्यसने शिवराज पाटील जीजी कानडीकर ईश्वर लगाडे एन मधुकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बेळगाव गोवा कोल्हापूर पुणे आलेल्या वधू-वरांनी आपला परिचय उपस्थितांना करून दिला
इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना प्रकाश मरगळे म्हणाले की मराठा समाजात विवाह वेळेवर होण्याबरोबर इच्छुक मुलींनीही नोकरीवाल्या बरोबर व्यवसायिक मुलांनाही प्राधान्य द्यावे तसेच चूल मूल न करता नोकरीकडे किंवा एखाद्या व्यवसायाकडे वळावे असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी वधु वर मेळावा यशस्वी करण्याकरिता दत्तात्रय जाधव प्रकाश गडकरी जाधव अशोक अंकले राजू पावले कविता देसाई मोहन सप्रे यांच्यासह आदींनी विशेष परिश्रम घेतले तसेच सूत्रसंचालन के एल मधुकर यांनी केले. तर आभार संग्राम गोडसे यांनी मानले.