आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान कटल्याचे आगमन जलोषात करण्यात आले आहे. यावेळी दुपारी चार वाजता समादेवी मंदिरापासून वाजत गाजत ढोल ताशांच्या मिरवणुकीत तसेच गुलालाच्या उधळणीत कटल्याला ला आणून येथील मंदिरात औक्षण करून पूजन करण्यात आले.
प्रारंभी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येथील मंदिरात ज्योतिबा देवाला अभिषेक करून पालखी पूजन करण्यात आले . तसेच आरती करुन तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले
सालाबाद प्रमाणे नार्वेकर गल्ली बेळगाव येथून पायी जाणारे भक्त पालखी व बैलगाड्या गुरुवार दिनांक 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थान येथून निघणार आहेत. तरी ज्या भक्तांना ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत जात जावयाचे असल्यास त्यांनी नाना अष्टेकर 9901058111 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच हेब्बाळ ,संकेश्वर ,निपाणी ,कागल कोल्हापूर येथे वस्ती करून मंगळवार दिनांक 12 एप्रिल रोजी जोतिबा डोंगरावर पोचणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री दवणा आणि शनिवार दिनांक 16एप्रिल रोजी पालखी (सबीणा )सोहळा होणार आहे .तसेच परत माघारी गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबील घुगऱ्याची जत्रा करून पालखी नार्वेकर गल्ली बेळगाव येथे पोहोचणार आहे. याची बेळगाव परिसरातील सर्व ज्योतिबा भक्तांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.