पिरनवाडी चिन्नपट्टन येथे पंचकल्याण प्रतिष्ठापना उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दिनांक 2 एप्रिल पासून पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाला सुरुवात झाली होती.पाच दिवसांच्या या महोत्सवासाठी पिरनवाडी तील आमराईच्या बाजूला भव्य मंडप उभारला होता.
कित्येक वर्षानंतर गावात पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव असल्याने जैन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.आचार्य श्री 1008 श्री धर्मसिंह मुनी महाराज श्री 108 श्री वृषभ सहाप महाराज परमपूज्य जिनसेन भट्टारक महास्वामी आदींच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव करण्यात आला.
पाच दिवसांच्या या महोत्सवात बुधवारी सकाळी नित्य पूजा करण्यात आली. दुपारी नेमिनाथ तीर्थकरांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.गावातील महिला 108 मंगल कलश घेऊन उपस्थित होत्या.या मंगल कलश यांची स्वामीजींच्या हस्ते विधीवत पूजाअर्चा करण्यात आली.मूर्तीची प्रतिष्ठापना जैन बस्ती येथे करण्यात आली.
पाच दिवस सुरु असलेल्या महोत्सवाची बुधवारी सांगता झाली पिरनवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांनी महोत्सवात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.शेकडो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. या सोहळ्यात इतर समाजाचे नागरिकही सहभागी झाले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून गावात एकात्मतेचे दर्शन घडले.