बेळगाव येथे एका खासगी समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आले असता कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी बेळगाव येथील आर एस एस मुख्यालयाला भेट दिली.
या प्रसंगी त्यांनी कार्यालयाला भेट देऊन स्थानिक आर एस एस पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी आपण कोणत्या गावाला गेले तेथील संघाच्या कार्यालयाला भेट देतो असे सांगितले.
तसेच 2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपल्या नियोजित पुढील कार्यक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.