गणेशपूर येथे रात्री 3च्या सुमारास डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भारती उपेंद्र यलगुद्री वय 47 असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. सदर महिलेने आपल्या मुलाने अभ्यास केला नसल्याने रागाच्याभरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
भारती यांनी गळ्याला फास आवळून आत्महत्या केल्याचे तिच्या घरच्यांच्या लक्षात येताच तिला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र उपचारांचा काहीही उपयोग न झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.