रमजाननिमित्त शहापूर नवी गल्ली येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आयोजित केलेल्या इफतिहार पार्टीत सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. तसेच जातीय सलोखा किती गरजेचा आहे याबद्दल महत्त्व विशद केले.
सदर इफतिहार पार्टी शहापूर नवी गल्ली येथील मशिदीसमोर आयोजित करण्यात आली होती. यावेळी वेगवेगळ्या जाती-धर्माच्या पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते.
याप्रसंगी शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनायक बडी गेर नगरसेवक रवी साळुंखे रवी शिंदे सचिन गुरव मनीष रामचंद्रानी माजी नगरसेवक नेताजी जाधव भवानी राजपुरोहित बँकेचे संचालक सतीश पाटील परशुराम ढगे अमजद मोमिन हमीद बागलकोट अब्दुल बागलकोट सल्लू पटेल बशीर मुल्ला इर्षाद आणि अनगोळकर यांच्यासह आणि उपस्थित होते.