27 जून रोजी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मराठी कागदपत्रांसाठी अजूनही सीमा भागातील नागरिकांना झगडावे लागत आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा नेण्यात येणार आहे.
मराठी माणसांच्या हक्कासाठी तसेच मराठी भाषेसाठी मराठी बांधवांनी एकत्रित यावे असे आवाहन बुधवारी बेनकानहळ्ळीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी लक्ष्मण खांडेकर होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून मोर्चात सहभागी होऊन सर्वांनी आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले आहे.
यावेळी तुळसा पाटील बाबाजी देसुरकर चेतन पाटील मोहन गरग दत्ता उघाडे महेश जुवेकर, दीपक दळवी शिवाजी सुंठकर यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सदस्य तसेच युवा आघाडीचे सदस्य उपस्थित होते.