न्यायालय आवारातील काही जागांनी आज मोकळा श्वास घेतला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी या ठिकाणी व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी असलेली अनधिकृत आणि विनापरवाना खोकी चहाची टपरी खाद्यपदार्थांचे स्टॉल आज हटविण्यात आले . सदर अतिक्रमणाची कारवाई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
त्यामुळे येथील जागेने आज मोकळा श्वास घेतला.