No menu items!
Wednesday, February 5, 2025

12 जूनपासून गोव्यात दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन

Must read

*इस्लामिक देशांच्या भारतविरोधाला उत्तर देण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक

गोवा येथे गेल्या 10 वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले आहे. भाजपच्या प्रवक्त्या असतांना नुपूर शर्मा यांनी इस्लाम संदर्भात केलेल्या विधानावरून जगातील अनेक इस्लामी राष्ट्रे एकत्र येऊन भारताला विरोध करत आहेत. अल् कायदाने तर थेट भारतावर हल्ल्याची धमकी दिली आहे; परंतु शिवलिंगाला ‘फव्वारा’ म्हणून किंवा हिंदु गुप्तांगाची (शिवलिंगाची) पूजा का करतात ? असे हेतूपूर्वक बोलून हिंदूंच्या धार्मिक भावना डिचवणार्‍यांच्या विरुद्ध कोणीही विरोध प्रकट करतांना दिसत नाही. यातूनच जगात एकतरी हिंदूंचे राष्ट्र का आवश्यक आहे, हे लक्षात येते. यासाठीच यंदा 12 ते 18 जून 2022 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पणजी, गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेस ‘भारत माता की जय संघटने’चे गोवा राज्य संघचालक श्री. सुभाष वेलिंगकर, ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि ‘सनातन संस्थे’चे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते.

यंदाच्या हिंदु अधिवेशनाचे वैशिष्ट्य – ‘हिंदु राष्ट्र संसद

यावेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले की, या १० व्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?’, याविषयी दिशादर्शन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसदे’चे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनातील तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेतली जाणार आहे. त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग’, ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ आणि ‘हिंदु शैक्षणिक धोरणांचा अवलंब कसा करावा ?’ या विषयांवर तज्ञ मान्यवरांकडून विस्तृत चर्चा होणार आहे.

यावेळी ‘भारत माता की जय संघटने’चे गोवा राज्य संघचालक श्री. सुभाष वेलिंगकर* म्हणाले की, सध्या देशात सर्वत्र हिंदूंच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘दी कश्मीर फाइल्स’नंतर देशभरात अनेक ठिकाणी दंगली आणि हिंसाचार केला गेला. गोव्यातसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. या घटनांमागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’(PFI) सारख्या कट्टरपंथी संघटनांचा हात असल्याचे उघड झाले आहे. ही संघटना गोव्यात ही सक्रीय झाली आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चा अभिनव प्रयोग केला आहे. गोवा इन्क्विझिशनच्या माध्यमातून पूर्वी ज्याप्रकारे हिंदूंचा छळ झाला तसा भविष्यात पुन्हा होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले* की, केंद्रात आणि अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार आल्यामुळे राममंदिर निर्माण, कलम 370 हटवणे, तसेच लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कायदे झाल्यामुळे सकारात्मक कार्य झाले असले, तरी काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे बाकी आहे. ओवैसी ‘ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, असे सांगत आहे. मिशनर्‍यांकडून बलपूर्वक होणार्‍या धर्मांतरामुळे ‘लावण्या’सारख्या हिंदू मुलीला आत्महत्या करावी लागत आहे. काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला 32 वर्षे होऊनही काश्मिरी हिंदूंच्या हत्या आजही थांबलेल्या नाहीत. आजही हिंदूंचे पलायन चालू आहे. त्यामुळे हिंदूंनी संविधानिक अधिकारांसाठी संघटित होणे आवश्यक बनले आहे. हिंदूंच्या व्यापक संघटनासाठी हे अधिवेशन दिशादर्शक ठरेल.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील 26 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’, ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण’, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूंचे संरक्षण’, ‘मंदिर-संस्कृती-इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

या अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक श्री. नागेश्वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील प्रख्यात आमदार टी. राजासिंह, ‘पनून काश्मीर’चे श्री. राहूल कौल, अरुणाचल प्रदेश येथील श्री. कुरु थाई, ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, पत्रकार, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंदजी महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.

या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील 58 हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी समर्थन पत्रे दिली आहेत. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

आपला विनीत,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्रमांक : 99879 66666)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!