स्विमर्स क्लब आणि अक्वेरियस स्विमर्स क्लब बेळगावचा खेळाडू अनिश पै याने सी बी एस ई दक्षिण विभागीय स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत यश संपादन केले आहे. दावनगेरे येथे 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत झालेल्या स्पर्धेत 1500 जलतरण खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यात के एल ई इंटरनॅशनल स्पर्धेचा खेळाडू अनिश याने यश संपादन केले आहे.त्याने 50 आणि 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात कांस्य पदक मिळवत शाळेचे आणि स्विमिंग क्लबचे नाव उज्वल केले आहे त्याला अनेकांचे मार्गदर्शन लाभत आहे
अनिश पै याची सीबीएसई दक्षिण विभागीय स्पर्धेत प्रभावी कामगिरी
