No menu items!
Wednesday, February 5, 2025

सांबरा येथे श्रमदानातून केली तलावाची स्वच्छता

Must read

दीपावलीनिमित्त सांबरा येथील युवकांनी श्रमदानातून बसवण तलावाची स्वच्छता केली. तलावातील कचरा संकलन करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यांच्या या विधायक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन बसवण तलावात करण्यात आले होते. तलावातील पाणी साठा कमी झाल्याने मूर्तीचे अवशेष दिसत होते. त्यामुळे युवकांनी पुढाकार घेत तलावाची स्वच्छता केली. मूर्तीचे अवशेष तसेच कचरा बैलगाडी तसेच ट्रॅक्टरमधून बाहेर नेऊन विल्हेवाट लावण्यात आली. शिवलिंगय्या अंगडी, प्रवीण जमखंडी, मारुती हंचीनमनी, मोहन हरजी, प्रकाश गिरमल, राजकुमार धनगर, सुरज सोनजी, गणेश हणमाई, केशव चिंगळी, विकी चिंगळी, निखिल चिंगळी, देवेंद्र इरोजी, रोहित चिंगळी, सुशांत सनदी, अमन हणमाई, केदारी जोई, ज्ञानेश्वर चिंगळी, गणेश सोनजी, मंथन सोनजी, किरण सोनजी, परशराम सोनजी, ज्ञानेश्वर सोनजी, साई हरजी, अमूल हणमाई, श्रेयश हरजी, ओमकार गिरमल,
यांच्यासह विश्वशक्ती युवक मंडळ, बसवेश्वर युवक मंडळ, अय्यप्पा स्वामी सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते श्रमदानात सहभागी झाले होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!