मतदार नोंदणीच्या प्रक्रियेस निपाणी तालुक्यात प्रारंभ झाला आहे. नव्या मतदारांच्या नोंदणीबरोबरच दुरुस्ती मोहीमही सुरू झाली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी केले आहे.
निपाणी तालुक्यात १८ व १९ नोव्हेंबर, २ व ३ डिसेंबर या दिवशी विशेष मतदार जागृती अभियान राबविले जाणार आहे. गावोगावी मतदार नोंदणीसाठी जागृती होणार आहे.
१ जानेवारीपर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत असावे, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.