बेळगाव येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक २ शाळेच्या क्रीडापटूंनी केंद्रीय विद्यालय संघटना, पुणे आयोजित ५२ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या केंद्रीय विद्यालय क्रमांक २ शाळेच्या साईश्री पाटील हिने १०० मी., २०० मी. व ४०० मी. धावणे तसेच ४x४०० रिले स्पर्धेत कांस्य पदक, श्वेता बाळेकुंद्री हिने ४०० मी. धावणे, ४x४०० रिलेमध्ये कांस्यपदक, संचिता पाटील हिने ८०० मी. धावणे, ४x४०० मीटर रिलेमध्ये कांस्य पदक पटकाविले आहे. या तिघीही स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स क्लबच्या सदस्य आहेत. त्यांना क्लबचे प्रशिक्षक प्रदीप जुवेकर व शाळेचे क्रीडाशिक्षक मोहन गावडे यांचे मार्गदर्शन तसेच शाळेच्या मुख्याध्यापक महेंद्र कॉलरा यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
केव्ही शाळेच्या क्रीडापटूंचे यश
By Akshata Naik

Must read
Previous articleमाझे मार्गदर्शक हरपले
Next articleभव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार