ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचे कोल्हापूर मध्ये निधन झाले. राजाभाऊ सीमावरती भागात परिचित असणारी व्यक्तिमत्व होते राजाभाऊंचा बेळगावशी कनिष्ठ संबंध होता त्यांचा बेळगाव परिसरात मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात होता सीमा भागातील अनेक साहित्य संमेलन नियोजनात त्यांनी भाग घेतला होता.त्याचबरोबर बेळगाव परिसरातील अनेक साहित्य संमेलनात त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. ज्येष्ठ साहित्यिकाच्या आयुष्याच्या रंगमंचावरून आता कायमची एक्झिट झाली आहे तसेच विद्रोही चळवळीचा आवाज देखील हरपला आहे.
राजाभाऊ यांची अनेक पुस्तके गाजली आहेत त्यामध्ये न पेटलेले दिवे शोधयात्रा ईशान्य भारताची शोधयात्रा महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागाची ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत त्याचबरोबर त्यांनी नवऱ्याचं वैकुंठगमन कफन ही नाटके देखील गाजविले आहेत ते प्रॉमिथिअस या नावाने कवी म्हणून प्रसिद्ध होते.
आजवर विविध प्रकाराची बाराहून अधिक प्रकाशित पुस्तक त्यांच्या नावावर आहेत पण त्याखेरीजही साप्ताहिक साधना आणि सत्याग्रही विचारधारा या नियतकालिकांमधून राजाभाऊंनी भरपूर लिखाण केला आहे. व त्यांच्या लिखाणाला ग्रामीण वाचक ही मिळाला राजाभाऊंनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला लोकांशी संवाद साधला. हे करता करता त्यांनी बेळगावशी देखील आपले घनिष्ठ संबंध निर्माण केले..तसेच बेळगाव येथील जीवन संघर्ष फौंडेशन च्या व्यसन मुक्ती कार्यक्रमात त्यांनी युवकांना मोलाचे मार्गदर्शन देखील केले होते
त्याच बरोबर त्यांनी देवदासी चळवळ तंबाखू आंदोलन विडी कामगारांचा आंदोलन शेतकरी संघटना अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अनेक संस्था संघटनांमध्ये त्यांचा सहक्रिय सहभाग होता डाव्या विचारसरणीच्या विविध घटकांशी त्यांचा निकटचा व मार्गदर्शक म्हणून संबंध होता.
तसेच ते साहित्यातील राजा माणूस होते. त्यांनी प्रत्येक साहित्य प्रकारात केलेली मुशाफिरी ही लेखक म्हणून खूप थोर होती. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांचा स्पष्ट व्यक्तीपणाचे उदाहरण म्हणजे त्यांनी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला त्यावेळी मंत्री हर्षवर्धन वर्धन पाटलांच्या देखत माईक हातात घेऊन शासनाचा निषेध केला.
लेखकांच्यांवर हल्ले झाले. त्याविरुद्ध आवाज उठविण्यात राजाभाऊ नेहमीच अग्रस्थानी असायचे धारवाड येथे झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलनातील त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायचा राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या जाणाने सामाजिक आणि साहित्य क्षेत्राची न भरून येणारी हानी झाली आहे