महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. यामध्ये मागील बैठकीमध्ये इतिवृत्ताला मंजुरी देणे, वॉर्ड क्रमांक ३३ मधील ड्रेनेजची समस्या, वॉर्ड क्रमांक १६ ते २२ मधील पथदीप दुरुस्ती यावर चर्चा केली जाणार आहे. या स्थायी समितीच्या बैठकीचा अजेंडा तयार करण्यात आला असून अजेंड्यानंतर चेअरमनच्या परवानगीने इतर विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. वॉर्ड क्रमांक ३१ ते ३७, वॉर्ड क्रमांक ३८ ते ४४ आणि ५८ यामधील पथदीपांच्या दुरुस्तीबाबत चर्चा केली जाणार आहे. याचबरोबर इतर प्रभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
स्थायी समितीची बैठक आज
By Akshata Naik
Previous articleप्रगतिशील लेखक संघाचेमराठी साहित्य संमेलन28 जानेवारी रोजी
Next articleश्रीधर माळगी याने गाजविली जागतिक स्पर्धा



