न्यू वंटमुरी गावात हल्लेखोरांनी केलेल्या अमानुष हल्ल्यातील पीडितेच्या घरी जाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी न्यू वंटमुरी गावात बोलताना मंत्री म्हणाले की
अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. या प्रकरणाशी संबंधित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पीडित महिलेला मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. याशिवाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ५० हजार रुपयांची भरपाईही जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस अधिकारी, युवा नेते राहुल जारकीहोळी व न्यू वंटमुरी गावचे नागरिक उपस्थित होते.