बेळगाव महापालिका एससी-एसटी कर्मचारी संघ व कर्मचारी कुशल विकास संघ यांच्या संयुक्त बैठकीत नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. महापालिका आवारात शनिवारी (ता. १६) झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापालिका उपायुक्त (विकास) लक्ष्मी सुळगेकर – निपाणीकर होत्या. महापालिका एससी/एसटी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा मंजुश्री एम. यांची बदली झाल्याने रिक्त जागेवर यल्लेश बच्चलपुरी, उपाध्यक्षपदी डॉ. गजानन कांबळे यांना पुन्हा एकमताने निवड झाली. यावेळी भरत तळवार, सुरेश द्यावण्णावर, भरत कोलकार, देवेंद्र कांबळे, विशाल उच्चुकर, सुरेश मूर्तेनवर, संजू कंग्राळकर, जोतिबा अनगोळकर, सातक्का तळवार, राजश्री जाधव आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
महापालिका एससी/एसटी कर्मचारी संघाचे नूतन अध्यक्ष यल्लेश बच्चलपुरी
By Akshata Naik

Must read
Next articleया समस्येकडे नागरिकांनी वेधले आमदारांचे लक्ष