शहरातील बस सेवेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केएसआरटीसी डेपो प्रभारी संजू भोसले यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
राज्यात काँग्रेस सरकारने शक्ती (महिलांना मुफत बस प्रवासा) योजना जारी केल्यानंतर बसेस मध्ये गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे शाळा व महाविद्यालय विद्यार्थीना वेळेवर बसेस मिळत नाही झाली आहे. त्यामुळे जादा बसेस उपलब्ध कराव्यात, बस तुडुंब भरत असल्याने बसेस थाब्यावर थांबत नाहीत सिग्नलच्या ठिकाणी व इतर ठिकाणी थांबतात त्यामुळे बस मधून प्रवास करणाऱ्या त्रास होत आहे.बस मध्ये गर्दी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना जागा मिळत नाही. या पुढे बसेस कुठेही रस्त्या मध्ये थांबल्याचे निदर्शनास आल्या तर वाहतूक पोलिसा कडून बस चालकांना 1000 रूपये दंड आकारण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.