महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या कार्यालयामध्ये आज सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्लेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.
महिला आघाडीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By Akshata Naik

Must read
Previous articleउज्वल नगर अमन नगर मध्ये विकास कामांची पाहणी