संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे.पत्नीसोबतच्या खाजगी क्षणांची नोंद करून पत्नीला ब्लॅकमेल बेळगातील किरण पाटील हा करत होता .पुन्हा लग्न करण्यासाठी आणि पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पत्नीचा फोटो काढून अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत होता
पत्नीला घटस्फोट देऊ अन्यथा अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करू अशी धमकी दिला त्यामुले पतीची बोलणी ऐकून पत्नीला धक्काच बसला.अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न करूनही काही उपयोग न झाल्याने पत्नीने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पत्नी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली, कोर्टात गेल्यानंतरही तो पत्नीला सतत ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणानंतर किरण पाटील याने पोलीस ठाण्यात बोलावून तिची चौकशी केली असता त्याच्या मोबाईलवर पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो असल्याचे समोर आले. त्याला तात्काळ अटक करण्यात येणार असताना किरण पाटीलने तेथून पळ काढला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.
आता पोलिसांनीही त्याला संरक्षण देत जिल्हा रुग्णालयात दाखल केले.दोषी पती किरण पाटील बरा झाल्यानंतर आता त्याची हिंडलगा कारागृहात दाखल झाला आहे