होनगा गावात श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमी आयोजित दोन श्री राम मंगल अक्षत कलशाचे आगमन झाले. भैरवनाथ मंदिरात अक्षत कलशाचे विधिवत पूजन करून ठीक सहा वाजता भजन दिंडीच्या नामखोषात मंगल अक्षत कलश शोभा यात्रेला सुरुवात झाली.
यावेळी यात्रेत बाल स्वरूपातील राम सीता लक्ष्मण व हनुमान सजीव देखावा सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मिरवणूक भैरवनाथ मंदिरापासून सुरू होऊन कचेरीखाली दुर्गा कॉलनी लक्ष्मी गल्ली भैरवनाथ गल्ली राजाराम गल्ली नेताजी गल्ली तानाजी गल्ली बलभीम गल्ली ज्योती नगर फिरवून शेवटी विठ्ठल मंदिरात अक्षत कलशात ठेवण्यात आल्या
या मंगल अक्षता दिनांक 14 जानेवारीपासून गावात वाटण्यात येणार आहेत व दिनांक 22 जानेवारी या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना दिवशी गावात सर्व मंदिरात सकाळी अभिषेक करून नंतर विठ्ठल मंदिरात रामलीला अभिषेक भजन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे हे नियोजन संपूर्ण ग्रामस्थांनी मिळून केले आहे हे विशेष महत्त्वाचे आहे.