बेळगाव येथे महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार श्री.धैर्यशील माने व मुखमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री.मंगेश चिवटे हे बेळगाव मध्ये आले असता, त्यांनी वैद्यकीय कक्षाची सीमावासीयांची मदत व्हावी व त्याचा लाभ सीमाभागातील जनतेला व्हावा यासाठी पत्रकार परिषद घेऊन संबोधित केले, यावेळी ज्या प्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्द करून देत आहात त्याच धर्तीवर सीमाभागातील युवकांना रोजगाराच्या संधी व व्यवसाय निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एखादा आर्थिक कक्ष किंवा आर्थिक संस्था उबगरून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करावा, जेणेकरून येथील मराठी युवक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि त्याची नाळ महाराष्ट्राशी जुळती राहील अशी मागणी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष श्री.धनंजय पाटील यांनी धैर्यशील माने व मंगेश चिवटे यांच्याकडे केली. यावेळी दोघांनीही सीमाभागातील युवकांच्या समस्या जाणून घेतल्या व यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते
महाराष्ट्र सरकारने सीमावासीयांसाठी रोजगार व उद्योगासाठी आर्थिक पाठबळ द्यावे -धनंजय पाटील
By Akshata Naik

Previous articleहोनगा गावात होणार विशेष कार्यक्रम
Next articleया शाळेत झाली सावित्रीबाई फुले जयंती साजरी